किराणा दुकान फोडून मुद्देमाल लांबविणाऱ्या तिघांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर परिसरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानात चोरी करणार्‍या सराईत रेकॉर्डवरील तिघ संशयितांना स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील आनंद नागला यांचे मदनलाल पांडुरंग नागला नावाने किराणा दुकान आहे. या दुकानाचे शटर वाकवून दुकानातून ९० हजारांची रोकड लांबविल्याची घटना  २ जुलै रोजी रोजी घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शहरात दररोज घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षकांनी या घटना उघडकीस आणण्याबाबचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते.  शिवाजीनगरातील दुकान याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शंकर विश्वनाथ साबणे रा. गेंदालाल मिल याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोनि किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करुन संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने गौरव जगन साळुंखे व महेश संतोष लिंगायत रा. गेंदालाल मिल यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे यांच्या पथकाने केली.

 

Protected Content