फुले मार्केटमधील कापड दुकान फोडून ४५ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट मधील कापड दुकान फोडून ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत शुक्रवारी १५ जुलै रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूषण राजेंद्र पाटील (वय-२८) रा. पांजरपोळ, नेरी नाका, जळगाव हे आपल्या  कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे फुले मार्केटमध्ये देवा मेन्स वेअर नावाचे कापड दुकान आहे. गुरुवारी १४ जुलै रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे कापड चोरून नेला.  नेहमीप्रमाणे शुक्रवारी १५ जुलै रोजी दुपारी दुकान उघडले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे उघडकीला आले. भुषण पाटील यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार १५ जुलै रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ करीत आहे.

Protected Content