लोंढे येथील तरूणाची दुचाकी लांबविली; मेहुणबारे पोलीसात गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढे येथील तरूणाची दारासमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिकन नरसिंग चव्हाण (वय-३८) रा. लोंढे ता.चाळीसगाव हे शेती काम करतात. या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीई ८१६७) क्रमांकाची दुचाकी आहे. २५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली होती. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता दुचाकी आढळून आली नाही. परिसरातून दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी भिकन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सपोनि पवन देसले करीत आहे. 

Protected Content