निर्दयतने म्हशींची वाहतूक करणारे आयशर ट्रक पकडला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल प्लाझा जवळ निर्दयतने म्हशींची वाहतूक करणारे आयशर ट्रक नशिराबाद पोलीसांनी पकडला आहे. या वाहनात कोंबून भरलेलेल्या १७ म्हशींची सुटका केली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्यावरून अवैधरित्या १७ म्हशींची कोंबून निर्दयतेने वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती नशिराबाद पोलीसांना मिळाली. त्यानुसार बुधवार ३ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजता पोलीसांनी कारवाई करत आयशर ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ७२१२) पकडला. यावेळी पोलीसांनी वाहन ताब्यात घेत ट्रकमधील १७ म्हशींची सुटका केली. याप्रकरणी पोहेकॉ योगेश वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी इरफान खान हिरू खान रा. देवास, इसाक रूस्तम रा. सारबेटे ता. अमळनेर, हबीज हुसना रा. देवरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.

Protected Content