सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील तीन सहायक पोलीस निरिक्षकांची बदली झाली असून यात सावदा येथील जालींदर पळे यांचा समावेश आहे.
राज्यातील तीनशे सहायक पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील जालींदर पळे, विशाल जयसिंक टकले आणि संदीप दुनगहू या तीन अधिकार्यांचा समावेश आहे. जालींदर पळे हे सावदा येथील स्थानकात कार्यरत असून त्यांची कोल्हापुर परिमंडळात बदली करण्यात आलेली आहे. सदर बदल्यांचे आदेश अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.
या सोबत, विशाल टकले यांची पुणे शहर तर संदीप दुनगहू यांची छत्रपती संभाजी नगर परिमंडळात बदली करण्यात आलेली आहे. तर सावदा येथे नेमके कोणते अधिकारी येणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.