Home Cities जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षाचे नुतनीकरण: पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षाचे नुतनीकरण: पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

0
101


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |लोकसहभागातून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षाचे नुतनीकरण करण्यात आले. यावेळी पाण्याची पातळी वाढविण्यासाठी याठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे कामासह वृक्षरोपण करण्यात आले. या अंमलदार कक्षाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी होते. तर यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, दुय्यम अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. पोलीस ठाण्याच्या नुतणिकरणासाठी एमआयडीसीतील उद्योजकांचे सहकार्य लाभले. यामध्ये चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, दिपक चौधरी, रविकिरण कोंबडे, धनंजय जहुरकर, मनोज अडवाणी, संदीकादत्त मिश्रा, पद्मनाभन अय्यंगर, संजय व्यास, सुनिल मंत्री, महेश प्यारपियानी, राजेश अग्रवाल, चेतन चौधरी, मनिष अग्रवाल, माजी नगरसेवक मनोज अहुजा यांचे सहकार्य लाभले. नुतणिकरणाचे काम आर्किटेक मनोज पिट्रोदा यांचे मार्गदशनाखाली करण्यात आले आहे. यावेळी काम करणारे कामगारांचा देखील सत्कार करण्यात आला.


Protected Content

Play sound