पैशांसाठी विवाहितेला मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव- लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेस्कोमाता नगर परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला पैशांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पैसे आणले नाही म्हणून मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेस्को माता नगर परिसरात माहेर असलेल्या साधना चतुर कुवर (वय-३०) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री येथील चतुर दत्तात्रय कुवर यांच्याशी सन- २०१३ मध्ये झालेला आहे. लग्नानंतर काही वर्षांनी पती चतुर कुवर याने शेतात विहीर खोदायची आहे, घर बांधायचे आहे असे सांगून माहेराहून विवाहितेला २ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली तसेच सासू आणि सासरे यांनी देखील पैशांसाठी वेळोवेळी छळ केला. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला मारहाण करून जीवेठार मारण्याची दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान मंगळवारी १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी ृदिलेल्या तक्रारीवरून पती चतुर दत्तात्रय कुवर, सासू सखुबाई दत्तात्रय कुवर आणि सासरे दत्तात्रय गोविंद कुवर सर्व रा. साक्री जिल्हा धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रकाश गवळी करीत आहे.

Protected Content