कारचे टायर फुटल्याने अपघात; महिलेचा मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चांदणी कुऱ्हा गावाजनीक धावत्या कारचे अचानक टायर फुटल्याने रोडवरील भिंतीला अदळल्याने महिलेचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १९ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शरीफाबी शेख तय्यक (वय-५६) रा. धरणगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, शरीफाबी शेख तय्यकब या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी १९ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा शेख अफसर शेख तय्यब यांच्यासोबत कारने धरणगावकडून अमळनेर येथे जाण्यासाठी निघाले.  शरीफाबी यांचा मुलगा शेख अफसर शेख तय्यब हा कार चालवत होता. तर शरीफाबी पुढच्या सीटवर बसलेल्या होत्या.  धरणगाव तालुक्यातील चांदणी कुऱ्हा गावानजीक धावत्या कारचे अचानक टायर फुटले. त्यामुळे शेख अफसरचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळली. यात शरीफाबी या महिला गंभीर जखमी झाल्या. स्थानिक गावकरी आणि वाहनधारकांच्या मयतीने जखमी महिलेला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. दुपारी अडीच वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Protected Content