मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केतकी चितळेने शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. ;ती पोस्ट शेअर केल्याप्रकरणी पनवेल येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून हि तिसरी अटक आहे.
मेच्या सुरुवातीला अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवाराविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली. यात तिला अटक असून ती २४ मे पर्यत पोलीस कोठडीत आहे. तर तिच्यापाठोपाठ निखील भामरे या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. आता पुन्हा पनवेल येथील फूड स्टोल चालवणाऱ्या किरण इनामदार या तिसऱ्या व्यक्तीला शरद पवाराविरोधातली आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यावरून अटक करण्यात आली आहे. त्यास त्यास देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.