यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयात १३ सप्टेंबर रोजी संदीप पाटील यांनी करिअरसंदर्भात आदिवासी बहुल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भोळे, प्रा.कुरकुरे उपस्थित होते.
पदवी घेतल्यानंतर किंबहुना त्याअगोदरही बऱ्याच मुलींची लग्न आदिवासी पालक लावतात म्हणून कॉलेजमध्ये असतानांच स्पर्धा परीक्षेचा अभ्यासास सुरवात करा असे आवाहन पाटील यांनी केले. तसेच विद्यार्थिनी कमी काळात यश मिळवता येईल यासाठी सरळसेवा ,पोलीस भरती, रेल्वे भरती ला प्रधान्यक्रम देऊन मग ह्या छोट्या यशानंतर मग MPSC कडे मोर्चा वळवावा असे मत ह्या वेळी संदीप पाटील यांनी मांडले. मुलींना प्रेरणा मिळावी सदोहरण स्पष्टीकरण दिले. परीक्षेचा अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन,लागणारी पुस्तके आणि अभ्यासाला सुरवात कुठून आणि कशी करावी ह्या बाबतीत विद्यार्थ्यांनीना सखोल मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थीच्या शंका निरसन करण्यात आले.