जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव द्वारा संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरून, जळगावच्या एस. वाय. बी.एस.सी. वर्गातील विद्यार्थिनी झरीन फातिमा असलम खान हिने ऑनलाईन सायन्स क्विझ स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत द्वितीय क्रमांक , आणि 1501 रुपये रोख पारितोषिक पटकावला आहे.
हि स्पर्धा एरंडोल महाविद्यालयाने ऑनलाईन आयोजीत केली होती. या यशासाठी सायन्स असोसिएशन चे समन्वयक प्रा डॉ अख्तर शाह सर आणि त्यांची टीम – प्रा डॉ शबाना खाटीक, प्रा डॉ अमीनुद्दीन काझी, आणि प्रा उमर खान पठाण यांनी झरीनला मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. चांदखान, प्रा. डॉ. वकार शेख, बी.यू.एम.एस.चे वाईस प्रिन्सिपल डॉ. शुऐब शेख यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुलकरीम सालार, कॉलेजचे चेअरमन डॉ. इक्बाल शाह आणि संपूर्ण स्टाफ यांनी झरीन फातिमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.