मास्टर कॉलनीत चोरट्यांनी २ लाख २६ हजारांची रोकड केली लंपास

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दत्त नगरातील दत्त मंदिराजवळील एका घरातून भरदिवसा २ लाख २६ हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात शाहरुख खान अक्तरखान (वय २७, रा. मास्टर कॉलनी, दत्त नगर, दत्त मंदिराजवळ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास  शाहरुख व त्यांची पत्नी असे कामानिमीत्त घराचे बाहेर गेले होते. याचा फायदा घेत असतांना अज्ञात चोरटयाने उघडे असलेल्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेले प्लॅस्टीक पिशवीतील २ लाख २६ रोख रक्कम संमतीवाचुन लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले. याप्रकरणी शाहुरूख खान अक्तरखान यांनी गुरूवार १७ मार्च रोजी रात्री एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहेत.

 

Protected Content