चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमध्ये चढत असतांना दोन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविल्याची घटना चाळीसगाव बसस्थानकात १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मलाबाई महादू पाटील वय-७० रा. तळोदा ता.चाळीसगाव या वृध्द महिला रविवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र लांबविले. त्याचवेळी बसस्थानक आवारात लिलाबाई मिसरीलाल राठोड यांच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्राची देखील चोरी झाली. यावेळी दोन्ही महिलांनी त्यांच्या मंगळसुत्राचा शोध घेतला परंतू कोणतीही माहितीमिळाली नाही. अखेर त्यांनी रात्री १०.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राहुल सोनवणे हे करीत आहे.