घरासमोरून चोरट्यांनी लांबविली एलपीजी ॲटो रिक्षा

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रायपुर कुसुंबा गावातील दिपक श्रीराम मोरे वय ३० यांची एलपीजी ॲटो रिक्षा चोरून नेल्याची घटना ६ जून रोजी सकाळी ६वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी १६ जून रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिपक मोरे हे आपल्या कुटुंबासह जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबागावात वास्तव्याला आहे. ॲटो रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीडब्ल्यू ३५९९) क्रमांकाची एलपीजी ॲटो रिक्षा आहे. ५ जून रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची रिक्षा पार्कींगला लावलेली होती. ही रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. त्यांनी रिक्षाचा सर्वत्र शोध घेतला परंतू रिक्षाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रविवारी १६ जून रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहे.

Protected Content