Home क्राईम नवीन बसस्थानकावर चोरांचा धुमाकूळ; खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकडची चोरी

नवीन बसस्थानकावर चोरांचा धुमाकूळ; खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकडची चोरी

0
200

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात १९ जून रोजी सकाळी आठ वाजता एका प्रवाशाच्या पॅन्टच्या खिशातून तब्बल १ लाख ७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी तब्बल आठ दिवसांच्या तपासानंतर अखेर शुक्रवारी (२७ जून) रात्री ९ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील बोरीस येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर मुरलीधर पाटील (वय ४९) हे आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास असून, १९ जून रोजी कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आले होते. सकाळी आठ वाजता ते धुळ्याला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १ लाख ७ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

पैशांची चोरी झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तत्काळ सर्वत्र शोध घेतला आणि चौकशी केली. मात्र, त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, आठ दिवसांच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी शुक्रवारी (२७ जून) रात्री ९ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश पदमर करत आहेत. शहरातील बसस्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound