जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या भजी गल्लीतून एकाची दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपीला जिल्हापेठ पोलिसांनी कासारवाडी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलशन अशोक कुमार (वय-३४) रा. सिंधी कॉलनी जळगाव यांची दुचाकी (MH 19 AW 7088 काळे लाल नवीन बसस्थानका जवळील भजे गल्लीत मंगळवारी 22 मार्च रोजी दुपारी पार्किंग करून लावली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने चोरटा मनिश अमरसिंग राठोड (वय-२६, रा. टिटवे ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याला कासमवाडी परिसरातून चोवीस तासांच्या आत दुचाकीसह अटक केली आहे. तपासी अंमलदार पोहेकॉ सलीम तडवी व गुन्हे शोध पथकातील पो. ना. गणेश पाटील, पो.हे.कॉ. महेंद्र पाटील, पो.कॉ. समाधान पाटील, पो.कॉ. रविंद्र साबळे, पो.कॉ. विकास पहुरकर आदींनी या तपासात सहभाग घेतला.