जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असतील त्यामुळे राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला असल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमा आ.खडसे बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री सतिश पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधल्याचे पहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत होवून विविध कार्यक्रमांना सुरूवात करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री सतिश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केक कापून शरद पवार यांचा वाढदिवसा साजरा केला.
माजी मंत्री सतिश पाटील यांनी कार्यकर्त्यांचा वाढविला जोश
माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, महायुतीकडे अडीच वर्षाची सत्ता होती, त्यावेळी सत्तेत असलेल्या आमदारांनी आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला. परंतू हा निधी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत वापरण्यात आला आणि त्यांना विधानसभेत यश आले. पैशांच्या जोरावर ते निवडून आले. परंतू पुष्पा-२ चित्रपटातील डायलॉग मारत साला झुकेंगे नाही असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
मतभेद असेल त्यामुळेच मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला- खडसे
तर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, पवार साहेब हे ८४ वर्षाचे झाले, ते शतायुषी व्हावे अशी सर्व कार्यकर्त्यांची आहे. पवार साहेब हे एक विद्यापीठ आहेत. या विद्यापीठात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी शिकविल्या आहेत, अनेक नेते त्यांनी घडविले आहे. असे म्हणत त्यांनी महायुतीवर टिका केली आहे. भाजपा पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहे. परंतू जाता वाटपाचा तिढा सुटलेला नाही, कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद मिळावे यावरून त्यांच्या समन्वय दिसून येत नाही. त्यांच्यात काही मतभेद असतील त्यामुळे मंत्री मंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. दरम्यान विधानसभा निकालावर संपुर्ण महाराष्ट्रात संशय व्यक्त केला जात आहे. आम्ही अनेक निवडणूका जवळून पाहिलेल्या आहे. गेल्या विधानसभेत आम्ही सर्वांनी सक्रियेतेने काम केले आहे. महायुतीला एवढे मताधिक्क्य मिळले असं वाटत नव्हतं. महायुतीच्या उमेदवार हे मोठ्या फरकाने निवडून आले आहे. अनेक ठिकाणी गावच्या उमेदवाराला फार कमी प्रमाणात मतदान मिळाले आहे. त्यामुळे संशयाला जात आहे, परंतू शेवटी पराभव हा पराभव आहे तो स्विकारावा लागणार आहे.
महापालिकेतील घोळाची चौकशी करावी : खडसे
जळगाव पालिकेच्या मालकीच्या गिरणा पंपिंग परिसरात पाईपलाईन चोरी प्रकरणात माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांचे नाव समोर आले आहेत, तसेच मनपात दोन दिवसांपूर्वी लाच घेणाऱ्या एका अधिकाऱ्याला देखील अटक केली आहे, त्यांच्या सांगण्यानुसार आयुक्त यांना देखील पैसे द्यावे लागते, त्यामुळे त्यांची देखील चौकशी करण्यात आली. त्यामुळे जळगावला महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये चौकशी केली असता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोळ समोर येईल, महापालिकेतील सर्व विभागांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.