अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या महाराष्ट्र राज्यासह अमळनेर तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले असताना माझ्या बद्दल सदय स्थितीत अपप्रचार केला जात आहे.
शिरीष चौधरी उभे राहतात की नाही अशी चर्चा आहे. मात्र मी आगामी विधानसभा अपक्ष लढविणारच असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज २९ जुलै सोमवार रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
अमळनेर तालुक्यात सध्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. राजकीय नेते पोळ्या भाजण्यासाठी अफवा पसरवत आहेत. अमळनेर मतदार संघ हा काही नेत्यांच्या बोटावर नाचणारा मतदार संघ आहे. ते जे करतील तेच होईल असे सांगितले जातेय. तालुक्यात राजकीय नेते अपघाताने निवडून आले तो अपघातच होता. त्यांनी कार्यकर्त्यांना अफवा पसरविण्याचे काम लावले आहे.
आगामी विधानसभेत शिरीष चौधरी आमदारकी लढवणार नाहीत.अशीही अफवा पसरवीण्याचे काम सुरु आहे.संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत. यासाठी मी अपक्ष लढणार आहेच , मी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना मला समजतात मी निवडणूक अपक्षच लढणार. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही.त्यांच्या मनात राग आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच मी उमेदवारी करणार आहे.
तालुक्यातील दोन नेते स्वार्थासाठी एकत्र आले. जनतेच्या सेवेसाठी नाही. काही लोक राजकीय स्वार्थासाठी आपले रंग बदलतात त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल. जनतेचा कौल मोठ्या प्रमाणात माझ्याकडे आहे. गेल्यावेळी जातीचे राजकारण करण्यात आले. माझे सर्वांशी हीत संबंध आहेत मी मात्र अपक्ष उमेदवारी करील व ज्या पक्षाची सत्ता बसेल तिकडे मी जाईल.