मतदान केंद्रावर मोबाईल बाळगण्यास असेल बंदी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर दोन्ही मतदार संघात मतदान केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच ,कार्डलेस फोन, वायरलेस सेट सह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास, बाळगण्यास निर्बंध आहेत.
मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळे समूहाने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेऊन जावे लागणार आहे. किंवा एकमेकांजवळ सांभाळायला द्यावे लागणार आहे.

Protected Content