किनगावातील धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील मुख्य बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याकडे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून खड्डा बुजण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

किनगाव येथील गावातील नायगाव जाणाऱ्या राष्ट्रीय महा मार्गावरील मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला असुन या खड्डयामुळे कुठल्याही क्षणी मोठी गंभीर दुर्घटना होवु  शकते. किनगाव शहरातुन जाणाऱ्या या रस्त्यावरून किनगाव ते नायगाव ये जा करणाऱ्या नागरीकांची नेहमीच वर्दळ असते. सदरचा हा खड्डा मुख्य रस्त्यावर किनगाव तडवी वाडा तेथे एका गटारी वरचा धाप्याचा भाग खुप दिवसापासून तुटलेला आहे. परंतु या कडे ग्रामपंचायत पासुन तर सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांचे  कुणाचे ही लक्ष नाही. हा खड्डा चुकवितांना किंवा अंदाज चुकल्याने वाहनधारकांचे रोज  छोटेमोठे अपघात होत आहेत. या सर्व प्रकारामुळे संबधीत अधिकारी हे तिथे कुणाचा तरी मोठा अपघात होण्याची तर वाट पाहत नाही ना ! असे नागरीकांना वाटत असल्याने त्यांची या विषयी चिंता वाढली आहे. संबंधितांनी या प्रश्ना कडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाय योजना केल्या पाहिजेत अशी मागणी हिंदवी स्वराज्य सेनेचे कार्यकर्ते यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Protected Content