गंगटोक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिक्कीममध्ये आता विरोधी पक्षाचा एकही आमदार उरलेला नाही. विरोधी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे एकमेव आमदार तेनसिंग नोरबू लामथा हे सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा मध्ये सामील झाले आहेत. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे सध्या ३० आमदार आहेत. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
सिक्कीममध्ये या वर्षी १९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले होते. 2 जून रोजी जाहीर झालेल्या निकालात SKM ने 32 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या. 25 वर्षे सत्तेत असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला एक जागा मिळाली होती.
मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग दोन जागांवर विजयी झाले होते, त्यापैकी एक जागा त्यांनी सोडली होती. तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय यांनीही आपली जागा सोडली आहे. 32 जागांच्या विधानसभेत आता सत्ताधारी पक्षाचे 30 आमदार आहेत.