चोपडा (प्रतिनिधी) जीवनामध्ये यश गाठायचे असेल तर, आधी आपले ध्येय निश्चित करावे व मग प्रवासाला सुरुवात करावी. आपले कर्म आणि आपले ज्ञान यांची व्यवस्थित सांगड घातल्यास यश नक्कीच मिळते. कारण कर्म केल्याशिवाय नशिबही साथ देत नाही, असे मौलिक मार्गदर्शन भुसावळ येथील मध्य रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनिअर किरण नागपुरे यांनी केले. चोपडा येथील बारीवाड्यात आयोजित गुणवंत गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त बारीवाड्यात समस्त श्री सुर्यवंशीय बारी समाज पंच मंडळ चोपडा, नागावेल मित्र मंडळ, बारी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सामन्य ज्ञान स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा विविध प्रकारची बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मंचावर भुसावळ येथील सिनियर सेक्शन इंजिनिअर किरण नागपुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त शिक्षक मधुकर बंडू बारी, मधुकर काशिराम बारी, चोपडा बारी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संजय हरचंद बारी, बारी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी बारी, नागवेल मित्र मंडळाचे अध्यक्ष योगेश बारी, निवृत्त नायब तहसीलदार गणेश बारी, समाजातील ज्येष्ठ शंकर बारी, बारी युवा प्रकोष्ठचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश बारी हे उपस्थित होते.
याप्रसंगी मधुकर बारी, गणेश बारी यांनी मनोगत व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील बारी यांनी केले. विविध स्पर्धांचे परीक्षण वसंत नागपुरे, कल्पना बारी, किरण बारी, प्रा. सुनील बारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान बारी, जितेंद्र बारी, अजय बारी, स्वप्नील बारी, कुणाल बारी, चेतन बारी, लोकेश बारी, लतिकेश बारी, केशव बारी, भूषण बारी, मंगेश बारी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.