यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ग्रामीण रूग्णालयात सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
यावल तालुक्यातील शहरी आणी ग्रामीण क्षेत्रातील जनतेला योग्य आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुने शासनाच्या माध्यमातुन लाखो रुपये खर्च करीत यावल येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे. मात्र या ग्रामीण रुग्णालयात मागील दोन वर्षापासुन कायमस्वरूपी सक्षम वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी सेवेत नसल्याने रू रूग्णांचे प्रचंड हाल होत असुन त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना .गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांनी या विषयाकडे तक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
यावल तालुका हा आदिवासी क्षेत्रात येणारा तालुका असुन,येथील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. या गोरगरीब रुग्णांना खाजगी दवाखान्याचा अतिश्य महागडा उपचार खर्च परवडत नाही. यामुळे आर्थिकदृष्ठया दुर्बल सर्वसामान्य जनतेला योग्य आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हा दृष्टीकोन लक्षात घेवुन यावल येथे ग्रामीण रूग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम काही वर्षापुर्वी करण्यात आले असुन, दरम्यान या ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन असुन नसल्यासारखी आहे तर बेबी केअर युनिट परिपुर्ण व आदी आरोग्य सुविधांचा मोठा अभाव दिसुन येत आहे. यामुळे रूग्णांना तात्पुरत्या मिळणार्या औषधीवर समाधान मानावे लागते.
एवढेच नव्हे तर मागील दोन ते तिन वर्षापासुन या रुग्णालयात कायमस्वरूपी सक्षम असे वैद्यकीय अधिकारी नसल्याकारणाने सर्पदंश, अपघात किंवा विष प्राशन केलेल्या रूग्णांना यावलच्या रुग्णालयात आणल्यावर वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्याची परिस्थिती काय होते याची आपण कल्पना करू शकत नाही. त्यामुळे किरकोळ रूग्ण वगळता यावलचे रुग्णालयास सहाय्यक वैद्यकीय अधिक्षक वर्ग ३ , वैद्यकीय अधिक्षक १ पद , वैद्यकीय अधिकारी वर्ग२ची किमान चार पदे , औषधनिर्माण अधिकारी वर्ग ३हे १ पद यावलच्या रुग्णालयातील रिक्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाची इमारत केवळ शोभेची वास्तु बनली असुन, संपुर्ण रूग्णालय हे सद्यस्थितीला ऑक्सीजनवर सुरू आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत अशा गंभीर प्रश्नाकडे लक्ष देवुन या ठिकाणी सक्षम वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्या मागील दोन वर्षापासुन रिक्त असलेली पदे भरावी अशी मागणी होत आहे.