यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील बाजारपेठात काही मोजक्या ठिकाणी विक्रीला येत असलेले कंटुर्ले हे मानवी आरोग्या साठी लाभदायी व शक्तीशाली फळभाजीला बाजारात मोठी मागणी असल्याने भाव त्याचे भाव वाढत आहे. कांटोला किंवा कटूर्ल नावाने ओळखली जाणारी ही सर्वात शक्तीशाली फळभाजी आहे.
कांटोला हे अगदी कारल्यासारखे दिसते. या फळभाजीमध्ये भरपूर व्हीटॅमीन सी असते. या फळभाजीला सर्वात्तम भाजी म्हणतात ,या फळभाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळया नांवाने ओळखले जाते , जेवणात अत्यंत चविष्ठ लागणारी भाजी आहे. या गुणकारी फळभाजी मानवी आरोग्यावरील १० रोगांवर उपचार करण्याची क्षमता असून यात आरोग्य खनिज देखील आहे. ते लठ्ठपणापासुन ते मधुमेहासह बिपी नियंत्रण, कॅन्सर, फ्लू या सारख्या मोठया आजारांवर ही फळभाजी रामबाण उपाय आहे. या फळभाजीला काही मंडळी व्हेज चिकन देखील म्हणतात
आपण ज्या ज्या पद्धतीने बनवतात त्यात या भाजीची चव ही वाढते. या फळभाजीची लागवड डोंगराळ भागात जास्त होते. म्हणून तिला डोंगराळ भाजी म्हणुन ही बोलले जाते. आपल्या शरीरातील डोकेदुखी, मुळव्याध, बुद्धकोष्ठा, कॅन्सर व ज्यांना मलावरोधाचा त्रास असेल त्यांनी रोज ही भाजी खाणे अंत्यत फायदेशीर आहे. याशिवाय या फळभाजीत रोगप्रतिकारशक्ती देखील या भाजीमुळे सुधारली जाते. सध्या ही भाजी यावल शहरात काही मोजक्याच ठिकाणी विक्रीला जात असून नागरिकांमध्ये या भाजीला मोठी मागणी आहे .