धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२६) जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार व माजीमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे कार्यकारी संपादक विजय वाघमारे यांनी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पदाची संधी मिळाली आणि जिल्हा पालकमंत्री पदही मिळाले तर जिल्ह्यातील काही मुजोर अधिकाऱ्यांना झटका दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने जसा सेनेला पाठींबा दिला तसा राष्ट्रवादीने का दिला नाही ? या प्रश्नावर गुलाबराव म्हणाले की, मी प्रयत्न केले होते, पण राज्यात आमची महाविकास आघाडी नवी-नवी असल्याने त्यांची स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची इच्छा दिसली. त्यामुळे मी पण त्यांना जास्त आग्रह केला नाही.
नाथाभाऊंच्या येण्या-जाण्याने काही फरक पडत नाही
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नाथाभाऊ यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे, माझा नाही. मी त्यांना येतानाही पाहीले आहे आणि जातानाही पाहीले आहे. त्यामुळे ते आले काय किंवा गेले काय मला काही फरक पडत नाही.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2634501293307060/