अपघाताला जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी (व्हिडीओ)

gajanan malusare

जळगाव प्रतिनिधी । दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघातात 9 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर जळगाव शिवसेनेतर्फे आज जिल्हा पोलीस स्थानकात संबंधित ठेकेदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवदेन गजानन मालपुरे यांनी दिले आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून फागणे या महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम लांबणीवर पडलेली आहे. सरकारी नियमाप्रमाणे रस्ता रुंदीकरणासाठी कुठल्याही प्रकारचे काम सुरू करीत असताना ज्या ठिकाणचा रस्ता रुंदीकरण करायचे आहे. अशा रस्त्याच्या आजूबाजूला सुरुवातीस रुंदीकरणाचे काम व्हावयास पाहिजे, त्यानंतर मुख्य रस्ता दुरुस्ती अथवा नवीन बनविण्याचे काम करावे असा नियम आहे. यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, रस्त्याचे प्रोजेक्ट इन्चार्ज व काम घेतलेल्या ठेकेदार यांच्यासह इतर संबंधित व्यक्ती यांना माहिती असताना देखील आपसात हातमिळवणी करून तरसोद ते फागणे या महामार्गाचा मुख्य रस्तावर खड्डा खोदून ठेवलेला आहे. ज्यामुळे रस्त्यावरून मार्गस्थ जाणारे वाहन यांचा अपघात होऊन आणि प्रवाशांचा मृत्यू व जखमी झालेल्या घटना घडलेल्या आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी महामार्ग क्रमांक 6 वर एरंडोल जवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रक एक्सएल तुटून भरधाव वेगाने येणाऱ्या कालीपीली टॅक्सीवर आदळल्याने अपघातात 9 जणांचा बळी गेला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या संबंधीत अपघात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रोजेक्ट इन्चार्ज, रस्त्याचे काम घेतले ठेकेदार व संबंधित व्यक्तींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यासंदर्भात शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Protected Content