प्रेयसीसाठी पत्नीसह मुलांना घराबाहेर काढले; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । प्रेयसीसाठी आपली पत्नी व मुलांना घराबाहेर काढणारा पती, त्याची प्रेयसी व त्याच्या आई विरूध्द तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बांभोरी नाक्याजवळ राहणार्‍या विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या महिलेचे शेतीपयोगी साहित्य विक्री करणार्‍या युवकाशी लग्न झालेले आहे. काही दिवसांपासून एक महिला त्यांच्या घरी यायची. पतीला तिच्याबाबत विचारल्यानंतर नातेवाईक असल्याचे सांगत होता. मात्र, त्या दोघांचे फोटो पत्नीच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोघांच्या संसारात खटके उडायला सुरुवात झाली. त्या महिलेने सासूला या प्रकाराबाबत सांगितले. हा प्रकार सांगितल्यानंतर सासूने छळ करण्यास सुरुवात केली. २३ ऑक्टोबर रोजी पती व सासूने अंगावरील दागिने काढून घेतले. दोन मुलांसह त्या विवाहितेला घराबाहेर हकलले. पतीच्या प्रेयसीने तिला शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्या विवाहितेच्या फिर्यादीवरुन सासू, पती व त्याची प्रेयसी या तिघांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात घर घेण्यासाठी दीड लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने छळ करुन अंगावरील दागिने काढून घराबाहेर हकलून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content