वृद्धेच्या पिशवीतून तीन लाखांचा रोकड लांबविले

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत ठेवलेले तीन लाख रुपयांचा रोकडे चोरट्यांनी लंपास केल्याची थरारक घटना आज घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ओझर येथील वयोवृद्ध नामे राजेंद्र तान्हीराम वाणी ( वय – ५७) यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत तीन लाख रुपये ठेवले होते. मात्र चोरट्यांनी ते पिशवीसह लंपास केल्याची धक्कादायक घटना आज शहरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तत्पूर्वी सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झालेला आहे. यामुळे सदर भामटा कुठे आढळून आल्यास त्वरित शहर पोलीस स्थानकाला संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. यासाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. संदीप पाटील – पोलीस निरीक्षक (मो.९८५००८७४५६), सुहास आव्हाड- पोउपनि – (मो.८८५०१२६७१८), योगेश माळी- पोउपनि (मो.७९७२००५६३९) व योगेश बेलदार पोहवा (मो.७०२०३१६३३५) आदी संपर्क क्रमांकांचा समाविष्ट आहेत.

Protected Content