Home Cities अमळनेर बसस्थानक आवारातून महिलेचे दागिने लांबविले

बसस्थानक आवारातून महिलेचे दागिने लांबविले

0
54


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परिसरात महिलेच्या पर्समधून सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून दिल्याची धक्कादायक घटना बुधवार ३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आली आहे. या संदर्भात गुरूवार ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शितल हितेश पाटील वय-२३ रा. पिंपळे ता. अमळनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार ३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्या अमळनेर बसस्थानकात आलेल्या असतांना अनोळखी दोन महिलांनी त्यांच्या पर्समधून सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound