…तर ईडीसारख्या संस्थांना टाळे ठोकावे लागेल – सावंत

मुंबई । ईडीचे हे पाऊल अत्यंत निंदनीय असून एवढे घाणेरडे प्रकार होत असतील तर राजकारण कोणत्या स्तरावर जातेय हे दिसते. असेच सुरू राहिल्यास ईडीसारख्या संस्थांना टाळेच ठोकावे लागेल, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस धाडली आहे. मंगळवारी २९ तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. ही ईडी आहे की वेडी आहे. ईडीचे हे पाऊल अत्यंत निंदनीय असून एवढे घाणेरडे प्रकार होत असतील तर राजकारण कोणत्या स्तरावर जातेय हे दिसते. सत्तेसाठी इतके घाणेरडे प्रकार सुरू आहेत. असेच सुरू राहिल्यास ईडीसारख्या संस्थांना टाळेच ठोकावे लागेल, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

 

Protected Content