तांबापूर परिसरातून दुचाकीची चोरी

जळगाव प्रतिनिधी । तांबापूर येथील शामा फायर कंपनीसमोरून अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना ७ मे रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की,  नजीर हुसेन शेख शाकीर (वय-२८) रा. शामा फायर तांबापूरा हे मजूर असून आपल्या कुटुंबियांसह राहतात. ७ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरासमोर लावलेली (क्रमांक एमएच १९ बीएक्स ८८७१) दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. दुपारी २ वाजता दुचाकीजवळ गेले असता दुचाकी जागेवर नव्हती. परिसरात दुचाकीचा शोध घेवून दुचाकी मिळून आली नाही. नाजीर शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे करीत आहे.

Protected Content