रुग्णसंख्येनुसार राज्यांची ३ प्रकारात वर्गवारी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे.  केंद्राने  बाधितांच्या संख्येनुसार राज्यांची तीन प्रकारात वर्गवारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या म्हणजे  बाधितांची एकूण संख्या ५,५०,००० पेक्षा अधिक असलेल्या  राज्यांमध्ये आहे.

 

देशात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १,८३,१७,४०४ जण बरे झाले आहेत., ३७,३६,६४८ अॅक्टिव्ह केसेस असून, २,४२,३६२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यू हे कोमॉर्बिडीटमुळे झालेले आहेत.

 

०१- ६०००० पर्यंत एकूण  बाधितांची संख्या  असलेल्या राज्यांमध्ये  चंदीगढ  , त्रिपुरा , मणिपूर  , अरूणाचल प्रदेश  , मेघालय  , नागालँड  , लडाख  , सिक्कीम ,  दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दीव  , मिझोरम  ,  अंदमान व निकोबार  , लक्षद्वीपचा समावेश आहे

 

 

६०००१- ५,५०,००० एकूण  बाधितांची संख्या  असलेल्या राज्यांमध्ये  हरयाणा , बिहार , ओडिसा  , तेलंगण  , पंजाब , आसाम , झारखंड  , उत्तराखंड , जम्मू व काश्मीर , हिमाचल प्रदेश , गोवा , पदुच्चेरीचा समावेश आहे

 

५,५०,००० पेक्षा अधिक एकूण बाधित संख्या  असलेल्या राज्यांमध्ये  महाराष्ट्र , कर्नाटक , केरळ , उत्तर प्रदेश , तामिळनाडू, दिल्ली , आंध्रप्रदेश , पश्चिम बंगाल, छत्तीसगड , राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशचा समावेश आहे

Protected Content