कुऱ्हा पानाचे येथून दोन म्हशींची चोरी

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे ८० हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशींच्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावातील मोंढाळा रोडवर गणेश कैलास पाटील (वय-२२) रा. कुन्हे पानाचे यांचे गुरे बांधण्याचे खळे आहेत. गणेश पाटील यांच्या मालकीचे ८० हजार रूपये किंमतीचे दोन म्हैस बांधतात. २१ मे रोजी मध्यरात्री दोन्ही म्हैस अज्ञात चोरट्यांनी खळ्यातून चोरून नेले. हा प्रकार पहाटे ३ वाजता गणेश पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी परिसरात दोन्ही जनावरांची शोधाशोध केली. गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनुस मुसा शेख करीत आहे. 

Protected Content