भुसावळात रिक्षाचालकांना रोटरी रेलसिटीची मदत

भुसावळ, प्रतिनिधी ।  येथे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे शहरातील रिक्षाचालक बांधवांना प्लास्टिक पडदयांचे मोफत वाटप करण्यात आले. 

कोरोना महामारीमुळे शासनाने अनेक निर्बंध लावले आहे. त्यातच रिक्षाचालकांनाही कोरोना संसर्गापासून संरक्षणासाठी रिक्षाच्या मध्यभागी प्लास्टिक पडदा लावण्याची सक्ती करण्यात आली आहे.  नियम मोडणाऱ्या चालकांना दंडही आकारण्यात येत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असल्याने रिक्षाचालकांची आर्थिक कोंडी होत असल्याने रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने पुढाकार घेऊन भुसावळ शहरातील सर्व रिक्षाचालक बांधवांना मोफत प्लास्टिक कर्टन पडदा वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार आज गांधी पुतळा,यावल रोड येथे रिक्षा चालकांना आमदार संजय सावकारे, ट्रॅफिक इंचार्ज एपीआय गायकवाड,रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शहा यांचे हस्ते प्लास्टिक कर्टन पडदा वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणुन संदीप सुरवाडे काम पाहत आहे.  प्रोजेक्ट यशस्वी करण्याकरिता क्लबचे सदस्य विकास पाचपांडे, चेतन पाटील, मंगेश यावलकर, अमित भडंग, मनोज सोनार,प्रा. श्रीकांत जोशी, प्रा.पंकज भंगाळे, डॉ.मकरंद चांदवडकर, तुलसी पटेल, आशिष अग्रवाल, रजत बढे यांनी सहभाग घेतला.

Protected Content