अमळनेर शाळेतून ट्रॅक्टरचे टायर अन् डिस्कची चोरी

अमळनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या पाडसे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाने झाडांना पाणी देण्यासाठी खरेदी  केलेल्या ट्रॅक्टरचे टायर व डिस्क चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाडसे येथील  सरस्वती माध्यमिक विद्यालयात ऑनलाइनचे शैक्षणिक काम करून शाळेतील मुख्याध्यापक जगदीश पाटील,  शिक्षक मेघराज पाटील, भरत कोळी, रतीभान निकम, शिपाई राजेंद्र भील हे शुक्रवारी शाळेचे काम आटोपून दुपारी  1 वाजता घराकडे निघाले. त्यावेळी शिपायाने शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले. 17 रोजी शाळेत गेल्यावर  शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडल्याचे शिक्षकांना दिसून आले. तसेच शाळेच्या आवारात लावलेल्या ट्रॅक्टरचे  टायर व डिस्क ही चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. या संदर्भात मुख्याध्यापक जगदीश पाटील यांनी पो लिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.