जिल्ह्यात आज ११०४ बाधित रूग्ण आढळले; १०५८ जण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्हा कोवीड रुग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ हजार १०४  बाधित रुग्ण आढळून आले  आहे. तर  १ हजार ५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आज जळगाव जिल्ह्यातून २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे

जिल्ह्यात आजचे आकडेवारी

जळगाव १८१, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ १३२, अमळनेर ९३, चोपडा ७५, पाचोरा ४७, भडगाव ३७, धरणगाव ४१, यावल ४४, एरंडोल ४६, जामनेर ८३, रावेर ५५, पारोळा ४९, चाळीसगाव ६९, मुक्ताईनगर ४९, बोदवड ५१ आणि इतर जिल्हे १६ असे एकूण १ हजार १०४ रुग्ण आढळून आले आहे

जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १ लाख ११ हजार ५२८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९८ हजार ४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर ११ हजार १३२ रुग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.