धरणगावात २० मोटारसायकलींच्या पेट्रोलसह पार्टसची चोरी

धरणगाव अविनाश बाविस्कर । शहरातील कृष्णा गीता नगरात २० मोटारसायकलीच्या पेट्रोल आणि पल्सरची चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरातील २० मोटारसायकलींतून पेट्रोल आणि काही वाहनांचे पार्टस् चोरीला गेल्याचे उघडकीला आले. ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान (एमएच १९ डीएन ५६७१) या पल्सर गाउीचे पुढचे मॅकव्हील चोरीला गेले तर याच परिसरातील डॉ. नन्नवरे यांच्या (एमएच १९ डी १९६३) मोटारसायकलचे मागचे इंडीकेटर आणि पुढच्या भागाचे फेरींग चोरीला गेला.

सकाळी महेंद्र भाई सैनी आपली गाडी काढायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, चोरट्यांचे ठसे व गाडीचे पेट्रोल चोरीला गेले त्यांनी तात्काळ आजूबाजूला या परिसरातील कॉलनी वासियांशी फोनवर संपर्क केला तर सर्व कॉलनीवासी एकत्र आल्यावर समजले की, सर्वांच्याच गाडीतील पेट्रोल चोरीला गेले आहे व काही गाडींचे पार्ट्स सुद्धा चोरीला गेलेले आहेत. याप्रसंगी कॉलनीचे  नागरिक बी.एम. सैंदाणे, प्रल्हाद विसपुते, जे.एस.पवार, महेंद्र सैनी, गोकुळ महाजन, बाळू अत्तरदे , संजय सुतार , एस.एन.कोळी, ज्ञानेश्वर पवार, अमोल झटकर, संतोष जाधव, मनोहर बंसी, पी.डी.पाटील उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!