बंद घर फोडून मोबाईलसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी

भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील विद्यानगर येथील तरुणाचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शुक्रवार २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आले. या संदर्भात सायंकाळी ७ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शुभम प्रभाकर वानखेडे वय-२९, रा. विद्यानगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार २८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता शुभम वानखेडे हे घर बंद करून कामाच्या निमित्ताने बाहेर निघून गेले. त्यावेळी बंद घर असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आला. या संदर्भात शुभम वानखेडे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर सायंकाळी ७ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंकरे हे करीत आहे.

Protected Content