सरस्वती फोर्ड कंपनीचे शोरूम परिसरातून साहित्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ असलेल्या सरस्वती फोर्ड कंपनीचे शोरूमचे मागच्या आवारातून लोखंडी आसारी, व साहित्य चोरून नेल्याची घटना ११ मे रोजी उघडकीला आले. याप्रकरणी चौकशी अंती अखेर सोमवारी २४ जून रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ सरस्वीत फोड शोरूम आहे. या शोमच्या मागच्या आवारात काही लोखंडी आसारी व वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे. ४ मे ते ११ मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४२ हजार रूपये किंमतीचे लोखंडी आसारी आणि इतर साहित्य चोरून नेले. घटना उघडकीला आल्यानंतर शोरूममध्ये काम करणारे दिलीप बेंडाळे वय ७५ यांनी नशिराबाद पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २४ जून रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गिरीश शिंदे हे करीत आहे.

Protected Content