शाळेत चक्कर येऊन सहावीतील मुलीचा मृत्यू

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक शहरातील उपेंद्र नगरातील रुद्र द प्रॅक्टिकल स्कुल या शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या विद्यार्थिनीचा मंगळवारी सकाळी चक्कर आल्याने शाळेतच मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

उंटवाडी परिसरातील जगताप नगर येथील दिव्या त्रिपाठी ही मंगळवारी सकाळी शाळेत गेली होती. बरे वाटत नसल्याने आसनस्थळी ती डोके ठेवून बसली. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चक्कर आल्याने बेशुध्द होऊन ती खाली पडली. तब्येतीविषयी तिच्या पालकांना तातडीने कळविण्यात आले. वडील प्रतेश त्रिपाठी आणि शिक्षिका चैताली चंद्रात्रे यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

 

Protected Content