पोलीस निरिक्षकांना चोरट्यांची सलामी;बंद घरातून ५० हजार चोरले

रावेर प्रतिनिधी | रावेरात पोलिस निरिक्षक कैलास नागरे नव्याने रुजु होऊन काही दिवसत होत असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील पन्नास हजार रुपये रोख चोरुन नेऊन सलामी दिली आहे. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रा कडून मिळालेली माहीती अशी की येथील शिक्षक कॉलोनी मध्ये रहिवाशी न्यना फत्तू तडवी हे बाहेर गावी गेल्या असल्याने त्यांचे घर बंद असल्याने दि .३ – ९ -२१ ते ११ – ९ -२१ च्या दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरटयाने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी घरातील कपाटातील पन्नास हजार रुपये रोख चोरन नेला याबाबत नयना फत्तू तडवी यांनी रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या वरुन ४५४/४५७/३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांचा मार्गदरशनाखाली पी एस आय सोनवणे तपास करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!