जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा शिवारातील झोन-५ कॅम्प येथून ६ हजार रूपये किंमतीच लोखंडी आसारी चोरून नेल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता दोन जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा शिवारातील झोन-५ कॅम्प येथे रस्ते बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. याठिकाणी ठेवण्यात आलेले ६ हजार रूपये किंमतीच्या लोखंडी आसारी कैलास पांडूरंग सपकाळे आणि नाना माळी दोन्ही रा. आसोदा ता. जळगाव यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील सेक्यूरीटी सुपरवायझर कमलेश भाईदास भोई वय ३६ रा. पाळधी ता. धरणगाव यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता संशयित आरोपी कैलास पांडूरंग सपकाळे आणि नाना माळी दोन्ही रा. आसोदा ता. जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र देवीदास पाटील हे करीत आहे.