आनंद मेळावा येथून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सागर पार्क येथील आनंद मेळाव्यात आलेल्या एका तरूणाची ३५ हजार रूपये‍ किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, चेतन संजय कपोले वय ४० रा. वासूकमल विहार अपार्टमेंट, मानराज पार्क, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील सागर पार्क येथे आंनद मेळाव्या उभारण्यात आला आहे. दरम्यान चेतन कापोले हा देखील आनंद मेळाव्यात जाण्यासाठी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएल ४३३१) ने आलेला होता. त्यावेळी त्याने मेळाव्याच्या बाहेर दुचाकी पार्क करून लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला पंरतू कोणतीही दुचाकी मिळून आली नाही. अखेर मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी हे करीत आहे.

Protected Content