पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील तारखेडा येथे बंद घराचे कुलूप उघडून अज्ञात व्यक्तीने सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण ६८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, देवचंद संतोष कोळी (वय-४१) रा. तारखेडा ता. पाचोरा हे शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते कुटुंबियांसह शेतात कामाला गेले. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उघडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे टोंगल, सोन्याचे टॉप, सोन्याचे पतकी आणि २३ हजार ६०० रूपयांची रोकड असा एकुण ६८ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार दुपारी १ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी देवचंद कोळी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक करीत आहे.