यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शिवारातील शेतातील बांधावरून २२ हजार रूपये किंमतीचे ठिंबक नळ्यांचे बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुंजा डिगांबर पाटील (वय-७१) रा. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. यावल शिवारातील शेत गट क्रमांक १६३२ मध्ये त्यांचे शेत आहे. १४ जून रोजी रात्री ११ वाजता शेतातील काम आटोपून ते घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील २२ हजार रूपये किंमतीचे ठिंबक नळयांचे बंडल चोरून नेल्याचे बुधवार १५ जून रोजी सकाळी उघडकीला आली. याबाबत त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही काहीही आढळून आले नाही. गुरूवार १६ जून रोजी दुपारी ४ वाजता त्यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.