Home क्राईम मुंबई विमानतळावर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई विमानतळावर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

0
101

crime 1

 

मुंबई प्रतिनिधी । मुंबई विमानतळावर एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. विमानतळावरील इमिग्रेशन विभागात ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर अर्थात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिषेक बाबू असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून बाबू यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील P4 भागातील पार्किंगच्या इमारतीवरुन उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या अभिषेक बाबू यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र अभिषेक बाबू यांनी आत्महत्या का केली याची अद्यापही माहिती मिळाली नाही आहे.


Protected Content

Play sound