Home क्राईम महावितरणच्या उपकेंद्रातून तांब्याच्या रॉडची चोरी

महावितरणच्या उपकेंद्रातून तांब्याच्या रॉडची चोरी

0
52

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील महावितरणचे उपकेंद्राच्या बंद गेटमधून ९ हजार ४८० रूपये किंमतीचे पाच किलो तांब्याचे रॉड चोरून नेल्याचे  उघडकीला आले आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरात महावितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. या ठिकाणी महावितरण कंपनीच्या मालकीचे सामान ठेवण्यात येते. दरम्यान, १५ सप्टेंबर रोजीच्या रात्री अडीच ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ९ हजार ८४० रूपये किंमतीचे तांब्याचे रॉड अज्ञात चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कर्मचारी निलेश भंगाळे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेश चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound