Home क्राईम सुप्रिम कॉलनीत कार कन्व्हर्टरची चोरी; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा

सुप्रिम कॉलनीत कार कन्व्हर्टरची चोरी; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा

0
110

जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परिसरातून एका कारचे कन्व्हर्टरची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अंकुश विष्णू चौधरी (वय-३२) रा. जयभवानी किराणा दुकानाजवळ, सुप्रिम कॉलनी हे मजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीझेड ६८१४) क्रमांकाची कार आहे. कारचे ४० हजार रूपये किंमतीचे सायलेन्सर व कटेलिटीक कन्व्हर्टरची चोरी केल्याचे १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. अंकुश चौधरी यांनी ही कार त्यांच्या घरासमोर लावलेली होती. अंकुश चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे. 

 


Protected Content

Play sound