मास्टर कॉलनी परिसरातून गोऱ्हाची चोरी

जळगाव-लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनी परिसरातून एकाचा १५ हजार रुपये किमतीचा गोऱ्हा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना  घडली. याप्रकरणी गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मजहर खान सुजद खान (वय-३१, रा. ख्वाजा नगर, पिंप्राळा हुडको) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मास्टर कॉलनीतील त्याचे काकाच्या घराजवळ त्याचा मालकीचा गोऱ्हा बांधण्यात आला होता. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हा १५ हजार रुपये किमतीचा गोऱ्हा चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु काहीही माहिती मिळाली नाही, अखेर गुरुवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेले तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहे.

Protected Content