रेल्वे रूळांच्या बाजूला आढळला मृतदेह

 

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील ओरियंट कंपनीच्या बाजूला असणार्‍या रेल्वे रूळांवर एका व्यक्तीचा आज मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, नशिराबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणार्‍या ओरियंट सिमेंट फॅक्ट्रीजवळ असणार्‍या रूळांवर आज पहाटे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. प्रथमदर्शनी या व्यक्तीचा घातपात केला असल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान, या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.

Protected Content